Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली,तिघांचा मृत्यू, 27 जणांना वाचवण्यात यश

building collapse
, शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (19:12 IST)
लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये संध्याकाळी 5 वाजता एक तीन मजली इमारत कोसळली. हरमिलाप असे या इमारतीचे नाव आहे. इमारत कोसळताच तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. सुमारे 30 जणांची सुटका करण्यात आली. यापैकी 27 जखमींना लोकबंधू रुग्णालयात नेण्यात आले. आत्तापर्यंत आलेल्या बातम्यांनुसार तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पाच जण अजूनही गंभीर जखमी आहेत. 
 
मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी आणि लोकबंधू रुग्णालयात पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
या तीन माजली इमारतीचे नाव हरमिलाप आहे. इमारतीत औषधांची खरेदी -विक्री होत होती.आज संध्याकाळी इमारत कोसळली.एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.  घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे लोक उपस्थित आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. 
 
ट्रान्सपोर्ट नगर इमारत कोसळल्याची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी घटनास्थळी पोहोचले.या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे. 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsApp: व्हॉट्सॲपच्या या युजर्सना मिळणार नवीन ॲप अपडेट