आता तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठीही आधार कार्डची आवश्यक ठरणार आहे. विना आधार कार्ड मंदिरात प्रवेश करता येईल परंतु देवाचे दर्शन आणि प्रसाद म्हणून दिला जाणारा लाडू घेण्यासाठी मात्र आधार कार्ड बंधनकारक असणार आहे. याबाबतचा निर्णय तिरूपती बालाजी मंदिर समितीने घेतला आहे. परंतु यात मंदिर समितीने सूट ही दिली आहे. त्यामुळे आता तिरूमला डोंगरावरील बालाजीचे दर्शन घेण्यास चालत येणाऱ्या भाविकांना विशेष प्रवेश दर्शन आणि लाडूसाठी ओळखपत्राच्या स्वरूपात आधार कार्ड असणे आवश्यक आहे.