राजस्थानमधील अजमेरमध्ये काल रात्री रेल्वे अपघात झाला. मदार रेल्वे स्थानकाजवळ साबरमती-आग्रा सुपरफास्ट ट्रेनची मालगाडीला धडक बसली. या धडकेनंतर पॅसेंजर ट्रेनचे चार डबे आणि इंजिन रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात प्रवासी जखमी झाले आहेत.
ही घटना रात्री 1.10 वाजताची आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मदार रेल्वे स्थानकाजवळ साबरमती-आग्रा सुपरफास्ट ट्रेनच्या इंजिनसह चार डबे रुळावरून घसरल्याचे वृत्त आहे. तात्काळ बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. जखमींना उपचारासाठी अजमेर स्थानकात नेण्यात आले आहे.मदार स्थानकाजवळ रात्री 1.10 च्या सुमारास मालगाडी आणि एक्स्प्रेस दोन्ही एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला.
रेल्वे अपघातानंतर प्रवाशांनी सांगितले की ट्रेन रात्री 12:55 च्या सुमारास अजमेर रेल्वे स्थानकातून निघाली आणि काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी जोरदार हादरा बसला आणि सीटवर झोपलेली लहान मुले, महिला आणि वृद्ध लोक सीटवरून खाली पडले. अपघाताच्या कारणांचा शोध सुरू असल्याचे घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रवाशांना सुरक्षितपणे अजमेर रेल्वे स्थानकावर नेण्यात आले आहे. तसेच ट्रॅक साफ करण्याचे काम सुरू आहे. दोन्ही गाड्या एकाच रुळावरून आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खबरदारी म्हणून अजमेरच्या प्रमुख रुग्णालयांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.