Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

रोहतकमधील तिहेरी हत्येची एकमेव प्रत्यक्षदर्शी तमन्नाचा ही मृत्यू

triple murdercase
रोहतक , बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (16:38 IST)
रोहतकच्या विजय नगर कॉलनीतील तिहेरी हत्येचा प्रत्यक्षदर्शी तमन्नाचाही मृत्यू झाला आहे. तिच्यावर दोन दिवस पीजीआय रोहतक येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री नातेवाईकांनी तिला गुरुग्राम मेदांता रुग्णालयात नेले. तेथून शनिवारी दुपारी तिला पुन्हा पीजीआयमध्ये आणण्यात आले. रविवारी पहाटे तिचे निधन झाले.
 
कुटुंबातील एकुलत्या एका मुलानं आपले वडील, आई, बहीण आणि आजीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं त्याने या सर्वांची हत्या केली. अनेक दिवस पोलीस या हत्याकांडाचा तपास करत होते. अखेर या हत्येचा सूत्रधार बाहेरचा कुणीच नसून घरातीलच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यासाठी केली हत्या हरियाणातील रोहतकमध्ये प्रदीप मलिक, त्यांची पत्नी, मुलगी नेहा, सासू आणि मुलगा अभिषेक राहत होते. प्रदीप मलिक यांनी या घराची वासरदार म्हणून मुलीचं म्हणजेच नेहाचं नाव लावलं होतं. ही बाब अभिषेकला मान्य नव्हती आणि घर आपल्याच नावे असावं, यासाठी तो आग्रही होता. त्याशिवाय इतर छोट्या मोठ्या कारणांवरून त्याची घरच्यांशी सतत भांडणं होत होती. 
 
एक दिवस अभिषेक घरात नसताना हल्लेखोर घरात घुसले आणि सर्वांना त्यांनी गोळ्या घातल्या. कुटुंबातील प्रत्येकाच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेत तिघे जागीच ठार झाले, तर नेहा गंभीर जखमी झाली. नेहाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्याचे धागेदोरे पोलिसांना मिळायला सुरुवात झाली. 
 
असा लागला शोध
हत्येचे कुठलेच धागेदोरे बाहेर सापडत नसल्यामुळे पोलिसांना अभिषेकवरच संशय आला. घराची किल्ली बाहेर कशी गेली, याचा शोध घेताना पोलिसांना अभिषेकवर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच अभिषेकने आपला गुन्हा मान्य केला. त्याच्या मित्रांनीच ही हत्या केली असून त्यांच्याकडे अभिषेकच्या घराची किल्ली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अभिषेकला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत. मात्र प्रॉपर्टीच्या मोहापायी 20 वर्षांच्या एकुलत्या एका मुलाने सर्व कुटुंबाची हत्या केल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तालिबानमध्ये समलिंगी पुरुषावर बलात्कार, LGBTQ समुदायाचे लोक देखील धोक्यात