उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी त्रिवेंद्र सिंह रावत यांची निवड झाली आहे. शनिवारी दुपारी 3 वाजता नव्या सरकारचा शपथग्रहण समारंभ पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाहसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशातून विभक्त झाल्यानंतर उत्तराखंड विधानसभेची ही चौथी निवडणूक झाली. 70 सदस्यांच्या या विधानसभेत आजवर कोणत्याही पक्षाला 40 पेक्षा अधिक जागा कधी मिळाल्या नव्हत्या. भाजपाला यंदा 57 जागा मिळाल्या तर काँग्रेसला अवघ्या 11 जागांवर समाधान मानावे लागले.