Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंत्रालयाने दिली तीन टीव्ही चॅनल्सला चेतावणी

मंत्रालयाने दिली तीन टीव्ही चॅनल्सला चेतावणी
नवी दिल्ली , बुधवार, 14 डिसेंबर 2016 (11:48 IST)
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सामग्रीबद्दल तीन वेग वेगळ्या चॅनल्सला चेतावणी दिली आहे. मंत्रालयाद्वारे नियुक्त अंतर मंत्रालयीन समितिने मानले आहे की या चॅनल्सची सामग्री प्रसारण नियमांच्या प्रतिकूल होती.  
 
मंत्रालयाच्या आदेशात रिकॉर्डनुसार पहिल्या प्रकरणात एका टेलीविजन चॅनलला 29 नोव्हेंबरला जारी आदेशाच्या आधारावर चेतावणी देण्यात आली, कारण चॅनलने केरळमध्ये एका आत्महत्येच्या घटनेला दाखवताना त्या दृश्यांना अस्पष्ट न करता प्रसारित केले होते.  
 
दुसरे प्रकरणात देखील 29 नोव्हेंबरला जारी आदेशानुसार इतर चॅनलला चेतावणी देण्यात आली आहे. या प्रकरणात देखील चॅनलने रक्ताने  माखलेल्या हत्येच्या शिकार व्यक्तीच्या दृश्यांना अस्पष्ट न करता तसेच दाखवले होते.  
 
मंत्रालयाने यौन शोषणाची शिकार एका पिडीतेची ओळख दाखवणे आणि नियमांची पुष्टी न करणारी इतर सामग्री दाखवल्यामुळे एका चॅनलला देखील चेतावणी देण्यात आले होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराटच्या करिअरमध्ये सचिनचा तो सल्ला ठरला निर्णायक