Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुवाहाटी रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आले दोन बांग्लादेशी आतंकवादी, भारतात राहून करीत होते प्लॅनिंग

गुवाहाटी रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आले दोन बांग्लादेशी आतंकवादी, भारतात राहून करीत होते प्लॅनिंग
, मंगळवार, 14 मे 2024 (14:36 IST)
आसाम पोलिसांच्या स्पेशल टीमने गुवाहाटी रेल्वे स्टेशनवर दोन बांग्लादेशी आतंकवादींना ताब्यात घेतले आहे. सांगितले जाते आहे की, हे अलंकायदाशी जोडलेले आतंकवादी गुजरात मधून आले होते आणि सिलचर येथे जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांचे लक्ष आसाममध्ये आतंकी नेटवर्क पसरविणे होते. हे दोघे विना पासपोर्ट अवैध रूपाने भारतात राहत होते. 
 
आसाम पोलिसांच्या सूत्रांनुसार हे आतंकवादी एबीटी चे सदस्य आहे आणि ते गुजरात मधून आले होते. तसेच अधिकारींनी सांगितले की, एका माहितीच्या आधारावर एक अभियान राबवण्यात आले व यांना रेल्वे मधून ताब्यात घेण्यात आले. 
 
अटक केल्यानंतर त्याच्या विरोधात आसाम पोलिसांनी स्पेशल सेल मध्ये प्रकरण नोंदवले आहे. आसाम पोलिसांनी एक अधिकारीक जबाबात सांगितले की, हे दोघे बांग्लादेशी नागरिक विना पासपोर्ट भारतात येत होते. हे आतंकवादी आतंकी नेटवर्क पसरवण्यासाठी प्लॅनिंग करीत होते. तसेच पुढील चौकशीसाठी आसाम पोलिसांनी तपासणी यंत्रणा सुरु केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चोरी करण्यासाठी एका वर्षात तब्बल 200 वेळा विमानात चढला एक व्यक्ती