Publish Date: Tue, 08 Oct 2024 (09:56 IST)
Updated Date: Tue, 08 Oct 2024 (10:00 IST)
उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात एका बंद घरामध्ये फटाके बनवतांना स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. व तीन जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, बेकायदेशीररित्या ही कंपनी घरामध्ये सुरु होती. तसेच ही घटना तरबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रगडगंज गावाची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका बंद घरामध्ये बेकायदेशीर पणे फटाके बनवले जाते होते त्यावेळी हा स्फोट झाला. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिथे दोन ज्यांना मृत घोषित करण्यात आले. तसेच जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती एका पोलीस अधिकारींनी दिली आहे.
Edited By- Dhanashri Naik