Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

कर्नाटकात इस्रायली पर्यटकासह दोन महिलांवर सामूहिक बलात्कार

gangrape with Israeli tourist
, शनिवार, 8 मार्च 2025 (18:09 IST)
कर्नाटकातील हंपी येथे काही अज्ञात लोकांनी एका परदेशी पर्यटकासह दोन महिलांवर बलात्कार केला आणि त्यांच्या सोबत असलेल्या तीन पुरुषांना मारहाण करून पाण्यात फेकले. तिघांपैकी एकाचा मृतदेह सापडला. 
मिळलेल्या माहितीनुसार, सदर घटना गुरुवारी रात्री 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान सोनापूर तलावाजवळ घडली.
ALSO READ: हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ईडीने 14 कोटी रुपयांचे खाजगी जेट जप्त केले
सोनापूर तलावाजवळ चार पर्यटक आणि होमस्टे संचालिका मजा करत असून मोटार सायकल वरून तिघे जण तिथे आले आणि त्यांनी पेट्रोल पंपाबद्दल विचारण्यास सुरु केले.
ALSO READ: अयोध्याहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी ट्रेनची झडती सुरु
तेव्हा होमस्टे संचालिकाने त्यांना जवळपास पेट्रोलपंप नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी पैसे मागण्यास सुरु केले.पर्यटकांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी कन्नड आणि तेलगू भाषेत शिवीगाळ करण्यास सुरु केले.नंतर तीन पुरुष पर्यटकांना पाण्यात ढकलले. आरोपीने 27 वर्षीय इस्त्रायली महिला पर्यटक आणि 29 वर्षीय होमस्टे संचालिका वर बलात्कार केला.शुक्रवारी सकाळपासून श्वान पथक आणि अग्निशमन विभागाचे अधिकाऱ्यांनी बेपत्ता पर्यटकाला शोधण्यास सुरु केले असता शनिवारी पर्यटकाचा मृतदेह सापडला.  
या घटनेचा तपास लावण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या प्रकरणाचा गंगावती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करत आहे.  
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय रेल्वेने आज आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त वंदे भारत ट्रेनची कमान महिलांकडे सोपवली क्रू मेंबर्समध्ये फक्त महिलांचा समावेश