Publish Date: Sat, 28 Feb 2026 (10:48 IST)
Updated Date: Sat, 28 Feb 2026 (10:55 IST)
शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी आणि तासनतास चालणाऱ्या प्रवासातून सुटका करण्यासाठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, उबर लवकरच त्यांची "इलेक्ट्रिक एअर टॅक्सी" सेवा सुरू करणार आहे. उंबर ने या सुविधेची घोषणा केली असून, याद्वारे आता मोबाईल ॲपवरून उडणारी टॅक्सी बुक करणे शक्य होणार आहे.
ही फ्लाइंग टॅक्सी केवळ दिसायलाच आधुनिक नाही, तर तिचा वेगही थक्क करणारा आहे. ही टॅक्सी ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावू शकते. (Uber Flying Taxi) यामुळे तासाभराचा रस्ते प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटांत पूर्ण होईल, असा दावा कंपनीने केला आहे. हे वाहन इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (eVTOL) तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यामुळे ते हेलिकॉप्टरप्रमाणे कमी जागेत उडू आणि उतरू शकते.ही पूर्णपणे इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी एका वेळी चार प्रवाशांना सामावून घेऊ शकेल.
कोणत्या शहरातून होणार सुरुवात?
उबर एअरच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागतिक स्तरावर काही शहरांची निवड करण्यात आली आहे. उबरची एअरफ्लाइंग टॅक्सी प्राथमिक टप्प्यात अमेरिकेतील डॅलस आणि लॉस एंजेलिस या शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. , दुबई हे पहिलेच शहर असेल जिथे ही फ्लाइंग टॅक्सी वापरता येईल. त्यानंतर, न्यू यॉर्क, लॉस एंजेलिस, युनायटेड किंग्डम आणि जपानसारख्या प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची निवड करण्यात आली असून, देशातील वाढती गर्दी पाहता मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये ही सेवा भविष्यात उपलब्ध करून देण्याचे संकेत कंपनीने दिले आहेत.
उबर एअरची वैशिष्ट्ये:
-
हे सामान्य हेलिकॉप्टर नाही तर भविष्यातील तंत्रज्ञानावर (eVTOL) आधारित असेल.
-
ॲप आधारित बुकिंग: ज्याप्रमाणे आपण उबर कॅब बुक करतो, त्याचप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने एअर टॅक्सी बुक करता येईल.
-
प्रदूषणमुक्त प्रवास: ही टॅक्सी पूर्णपणे विजेवर चालणारी असल्याने पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही.
-
वेळेची बचत: वाहतूक कोंडीच्या कटकटीतून मुक्तता मिळून वेळेची मोठी बचत होईल.
-
स्कायपोर्ट्स: या टॅक्सींच्या टेक-ऑफ आणि लँडिंगसाठी शहरात ठिकठिकाणी विशेष स्कायपोर्ट्स उभारले जाणार आहेत.
-
पूर्णपणे इलेक्ट्रिक: ते पेट्रोल किंवा विमान इंधनावर नाही तर बॅटरीवर चालेल.
-
बसण्याची क्षमता: यात एका वेळी ४ प्रवासी आरामात बसू शकतात.
-
पर्यावरणपूरक: हे प्रदूषण करणार नाही आणि सामान्य हेलिकॉप्टरपेक्षा खूपच कमी आवाज करेल.
-
सुपरफास्ट: वाहतुकीचा त्रास नाही, म्हणजे तुमचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होईल
भविष्यात ही सेवा सुरू झाल्यानंतर शहरी वाहतुकीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.