Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हेलिकॉप्टरने नाही, तर जमिनीवरुन पाहणी करतोय, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

हेलिकॉप्टरने नाही, तर जमिनीवरुन पाहणी करतोय, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा
, शुक्रवार, 21 मे 2021 (16:05 IST)
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. 
 
दरम्यान, कोरोना संकट असताना त्यात तौक्ते चक्रीवादळाने भर टाकली आहे. शेवटी वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर यावर नुकसान अवलंबून असतं. दुर्दैवाने काही मृत्यू झाले आहेत. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल, असं सांगितलं.
 
तोक्ते चक्रीवादळाने जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे पूर्ण होताच त्याचा संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करु. यात कोणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथे दिली.
 
जिल्ह्यात चक्रीवादळाने आंबा आणि काजू तसेच नारळाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामा योग्य पद्धतीने करुन नेमकेपणाने आकडेवारीसह प्रस्ताव सादर करा असे निर्देश मुख्यमंत्री या बैठकीनंतर अधिकाऱ्यांशी बोलताना दिले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरे उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, वशिलेबाजीला थारा नाही – अजित पवार