Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑगस्टमध्ये सुरु होणार महाविद्यालयं, युजीसीने दिली माहिती

ऑगस्टमध्ये सुरु होणार महाविद्यालयं, युजीसीने दिली माहिती
, बुधवार, 29 एप्रिल 2020 (22:41 IST)
करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील महाविद्यालयं उघडण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार आहे. ही माहिती विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC ने दिली आहे. सध्या महाविद्यलयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयं ऑगस्टमध्ये सुरु होणार तर नव्या विद्यार्थ्यांसाठी ही महाविद्यालयं १ सप्टेंबरपासून सुरु होणार असं यूजीसीने स्पष्ट केलं आहे. 
 
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. अशात २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी १ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे.
 
UGC ने दोन वेळापत्रकं दिली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयं बंद करण्यात आली. त्यामुळे या वर्षातला जो पाठ्यक्रम अपूर्ण राहिला आहे. त्यासाठी एक वेळापत्रक आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळापत्रक देण्यात आलं आहे.
 
मागील वर्ष म्हणजेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी अपूर्ण राहिलेला पाठ्यक्रम ऑनलाइन/ डिस्टन्स लर्निंग/ सोशल मीडिया/ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग यांच्या माध्यमातून ३१ मे २०२० पर्यंत शिकवण्यात येऊन पूर्ण करण्यात यावं तसेच इतर शैक्षणिक कार्य जसे प्रोजेक्ट रिर्पोट, इंटर्नशीप रिपोर्ट, ई लेबल्स, इंटरनल वेल्यूशन आणि असाइनमेंट्स हे सगळं १ जून ते १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावं, असं विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटलं आहे. यानंतर होणाऱ्या परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घेतल्या जातील. तसंच या परीक्षांचे निकाल ३१ जुलै २०२० रोजी जाहीर केले जातील.
 
तसेच २०२०-२१ हे शैक्षणिक नवीन विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्यापासून सुरु होईल आणि जुन्या विद्थ्र्यांसाठी शैक्षणिक वर्ष १ ऑगस्ट २०२० पासून सुरु होईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना व्हायरस : अस्तित्व टिकवण्यासाठी सर्कशींचा झगडा