Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितिन गडकरी अहमदनगर येथे चक्कर येऊन बेशुद्ध

नितिन गडकरी अहमदनगर येथे चक्कर येऊन बेशुद्ध
राहुरी , शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (13:28 IST)
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना आज राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान चक्कर आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान,  राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना अचानक चक्कर आली, त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. दरम्यान, नितीन गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.
 
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी त्यांनी भाषणही केले. मात्र कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना चक्कर आल्याने गडकरी कोसळले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या राज्यपालांनी गडकरींना सावरले. तसेच डॉक्टरांनी तातडीने गडकरी यांची तपासणी केली. त्यानंतर गडकरी यांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. प्राथमिक उपचारानंतर ते स्वतःच चालत गेले आणि वाहनात बसले. त्यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं. 
 
दरम्यान, या घटनेनंतर नितीन गडकरींचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसेच गडकरी यांना विशेष विमानाने नागपूर येथे नेण्यात येणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नव्हे, तर 'फसवणीस' : अशोक चव्हाण