रिलायन्स जिओने जेव्हा अनलिमिटेड 4 जी प्लान प्रस्तुत केले तेव्हा हे मोबाइल मार्केटसाठी गेम चेंजर सिद्ध झाले होते. या प्लानने केवळ टेलिकॉम सेक्टरच नव्हे तर इतर व्यवसायींनी शिकवणूक घेतली होती. जिओने प्रभावित होऊन गुजरातच्या एका चाटवाल्याने अनलिमिटेड प्लान सुरू केले आहे. ठेलेवाल्याने असे आपली कमाई आणि ग्राहक वाढवण्याच्या उद्देश्याने केले.
बातमीप्रमाणे पोरबंदर येथील एक पाणीपुरी विकणार्या रवी जगदंबा याने मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लानप्रमाणे पाणीपुरी प्लान प्रस्तुत केला. रवी याने 100 रुपये आणि 1000 रूपयांच्या दोन प्लान प्रस्तुत केले. 100 रूपये प्लानमध्ये ग्राहक एक दिवसासाठी पोटभर चाट आणि पाणी पुरी खाऊ शकतात तसेच 1000 रूपयेच्या प्लानमध्ये ग्राहक महिन्याभरापर्यंत या स्कीमचा लाभ घेऊ शकतात. विशेष म्हणजे या प्लानमुळे रवीचा व्यवसाय वाढत चालला आहे.
इंग्रजी वृत्तपत्र अखबार द टायम्स ऑफ इंडियाला रवी जगदंबा यांनी म्हटले की या आयडियाचे चांगले परिणाम दिसून येत आहे. याने ग्राहकांची संख्या वाढत आहे. आणि या योजनेमुळे रवीला शहरातच नव्हे तर देशभरात प्रसिद्धी मिळत आहे.