Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

24 तासांत 40 वेळेस धगधगले उत्तराखंडचे जंगल, दोन घरे जळाले एकाचा मृत्यू

fire
, शुक्रवार, 3 मे 2024 (10:25 IST)
उत्तराखंडमधील जंगलातील आग ही वाढतच आहे. मागील 24 तासांमध्ये 40 वेळेस वनाग्नीच्या घटना समोर आल्या आहे. अल्मोडा जिल्ह्यातील सोमेश्वर ठाणे परिसरात गुरुवारी जंगलच्या आगीत सापडल्याने नेपाळी श्रमिकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन महिला आणि एक पुरुष असे तीन श्रमिक गंभीर जखमी झाले आहे. जखमी झालेल्या या तीन श्रमिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 90 टक्क्यांपेक्षा जास्त जळाल्याने त्यांना हायर सेंटर रेफर मध्ये ठेवण्यात आले आहे. अल्मोडा वन रेंजच्या अधिकारींच्या मते, गुरवारी संध्याकाळी सूचना मिळाली की, ताकूल विकासखंड अंतर्गत येणार गणनाथ जवळ बेस्युनारकोटच्या जंगलात भीषण आग लागली आहे. 
 
हे श्रमिक जंगलामध्ये काम करीत असतांना अचानक एकाएकी जंगलात आग लागली आणि क्षणात वाढली. ते चारही बाजूनी आगीच्या तावडीत सापडले. त्यांच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक धावत आले. त्यामध्ये एका श्रमिकाचा मृत्यू झाला असून बाकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. 
 
उत्तराखंड मधील आग थांबण्याचे नावच घेत नाही आहे. गुरुवारी 24 तासांमध्ये 40 घटना नोंद केल्या गेल्या आहे. यामध्ये 64 हेकटर जंगल जाळून गेले आहे. आता उत्तराखंड मध्ये 804 आगीच्या घटना घडल्या आहे. यानंतर वनविभाग आता पूर्णपणे हायअलर्ट झाला आहे. तसेच कुमाऊँ मध्ये बुधवारी रात्री पिथौरागड, चंपावत आणि बागेश्वर मध्ये तीन घरे आगीच्या तावडीद सापडून जाळून गेलीत. वर्तमान मध्ये या घरांमध्ये कोणीच आहेत नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच घरातील सामान जळून गेल्याची माहिती समोर आली आहे. 14 जंगल आगीने धगधगत आहेत. यामुळे वनसंपदेला नुकसान होते आहे. 

Edited By- Dhanashri Naik   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bomb Threat: दिल्लीतील शाळांनंतर आता पोलीस मुख्यालयात बॉम्बची धमकी, आरोपीला अटक