Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : आज बारावा दिवस, बचावकार्य अंतिम टप्प्यात

Uttarkashi Tunnel
, गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (09:13 IST)
ANI
उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. बोगद्यात मजूर अडकल्याच्या घटनेचा आज 12 वा दिवस आहे.
 
बोगद्यातील ढिगाऱ्यात ड्रिल करत असलेले बचाव कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या जवळ आहेत, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
उत्तरकाशी रेस्क्यू ऑपरेशन टीमचे सदस्य गिरीश सिंह रावत म्हणाले की, "रेस्क्यू ऑपरेशन जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे, मला आशा आहे की 1-2 तासात निकाल येईल.कामगारांना बाहेर काढण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे.ढिगाऱ्यात अडकलेले स्टीलचे तुकडे कापून काढण्यात आले आहेत. पाईपलाईन ड्रिलिंगमध्ये उद्भवलेली समस्या सोडवली गेली आहे.पाइपलाईन टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोगद्यात मध्ये वीज पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय."
 
बुधवारी (22 नोव्हेंबर) संध्याकाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की त्यांना खात्री आहे की गुरुवारी दुपारपर्यंत कामगारांची सुटका केली जाईल.
 
12 नोव्हेंबर रोजी कामगार बोगदा बांधत असताना भूस्खलनामुळे त्याचा काही भाग कोसळला होता.
 
अधिकाऱ्यांनी काही तासांतच या बोगद्यात अडकलेल्या कर्माचाऱ्यांशी संपर्क स्थापित केला होता.
 
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन,अन्नपदार्थ आणि पाणी पोहचवण्यात आलं. याप्रकरणी अधिकारी नियमित अपडेट देत असून बचाव कार्य अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पण मजुरांचे कुटुंब आणि मित्र चिंताग्रस्त आणि संतप्त झाले आहेत. मजुरांना काढण्यासाठी इतका वेळ का लागतो आहे असा प्रश्न त्यांना पडलाय
 
सोमवारी(20 नोव्हेंबर) एंडोस्कोपिक कॅमेरा नवीन पाईपमध्ये टाकून मजुरांचा पहिला व्हीडिओ मिळाला होता. अधिकाऱ्यांनी त्यांना कॅमेऱ्यासमोर स्वतःची ओळख पटवण्यास सांगितलं आणि लवकरच त्यांची सुटका केली जाईल असं आश्वासन दिलं. बचावकर्ते कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.
 
नवीन पाईप रुंद आहे आणि अधिकारी म्हणतात की ते आता अधिक ऑक्सिजन, अन्न आणि औषधे, मोबाईल फोन आणि चार्जर यांसारख्या आवश्यक गोष्टींचा पुरवठा करता आला. मंगळवारी ( 21 नोव्हेंबर) तब्बल 10 दिवसांनी कामगारांना पहिलं गरम जेवण पोहचवण्यात आलं. डाळ तांदुळाची खिचडी पॅक करून त्यांना गरम जेवण बोगद्याच्या आत पाठण्यात आलं.
 
मजुरांच्या बचावासाठी चिन्यासौर मध्ये एक कम्युनिटी सेंटरमध्ये मजुरांसाठी एक तात्पुरतं रुग्णालय स्थापन करण्याचं काम वेगानं सुरू आहे.
 
बोगद्यात एनडीआरएफची टीम ऑक्सिजन सिलेंडर सकट आहे आणि बाहेर अनेक अँम्ब्युलन्स उभ्या आहेत.
 
काल (22 नोव्हेंबर) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारासच्या अपडेटनुसार 12 मीटर ड्रिलिंगचं काम अद्याप बाकी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंढरीत 5 लाखांवर भाविक दाखल