कोरोना व्हायरसमुळे परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी पुन्हा आणण्यासाठी मोदी सरकारने वंदे भारत मोहीम सुरु केली आहे. १६ मे ते २२ मे या काळात या मोहिमेचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात ३१ देशांत १४५ विमाने पाठवून भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जाईल.
आता दुसऱ्या टप्प्यात फ्रान्स, जर्मनी, इटली, आयर्लंड, थायलंड, रशिया, कझाकिस्तान, युक्रेन, किर्गीस्तान, जॉर्जिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नेपाळ या देशांमध्ये भारतीय विमाने पहिल्यांदाच जाणार आहेत. अमेरिकेत सर्वाधिक १३, त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) ११, कॅनडात १० , सौदी अरेबियात आणि ब्रिटनमध्ये प्रत्येकी ९ विमाने पाठवण्यात येणार आहेत.