Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

TMC नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचारात 5 घरे पेटविली, 7 जणांचा होरपळून मृत्यू

TMC नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचारात 5 घरे पेटविली, 7 जणांचा होरपळून मृत्यू
, मंगळवार, 22 मार्च 2022 (13:57 IST)
सोमवारी, टीएमसी पंचायत नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या लोकांच्या घरांना आग लावण्यात आली, त्यात ते जिवंत होरपळून मेले. याशिवाय मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी सांगितले की, बीरभूम जिल्ह्यातील बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यानंतरच रात्री ही जाळपोळीची घटना घडली, ज्यात 10 जणांना जिवंत जाळण्यात आले. भादू शेख हे बोगतुई गावाचे  रहिवासी होते. 
 
स्थानिकांचे म्हणणे आहे की टीएमसीच्या एका गटाच्या सदस्यांनी जाळपोळ केली. मात्र, तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. बीरभूम जिल्हा टीएमसी अध्यक्ष अनुब्रत मंडल यांनी मंगळवारी दुपारी दावा केला की हिंसाचाराच्या वेळी आग लागली नव्हती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यामुळे घरांना आग लागली. टीएमसी कार्यकर्त्यांच्या हल्ल्याचा इन्कार करत मंडल म्हणाले, "शॉर्ट सर्किटमुळे लोकांच्या घरांना आग लागली आणि त्यामुळेच मृत्यू झाला." सोमवारी रात्री कोणताही हिंसाचार झाला नाही.
 
आगीत किमान 10 घरे उद्ध्वस्त झाल्याचे आढळले आहे. "आम्हालाही काही स्थानिक लोकांनी आग विझवण्यापासून रोखले," त्यांनी सांगितले, आतापर्यंत एका घरातून 7 मृतदेह मिळाले आहेत. ते इतके गंभीररित्या जळाले आहेत की बळी गेलेले पुरुषआहे , महिला की अल्पवयीन हे देखील समजू शकत नाही. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
 
टीएमसीचे पंचायत नेते भादू शेख यांच्यावर चार अज्ञात मोटरसायकलस्वारांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी तोंड झाकले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. गोळ्या झाडल्यानंतर लगेचच शेख यांना रामपूर हाट येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. टीएमसीच्याच दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND W vs BAN W : भारताने बांगलादेशचा पराभव करत 110 धावांनी मोठा विजय नोंदवला