Publish Date: Fri, 15 Jul 2022 (16:45 IST)
Updated Date: Fri, 15 Jul 2022 (16:47 IST)
दिल्लीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. अलीपूर भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची भिंत शुक्रवारी अचानक कोसळली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, अनेक लोक भिंतीखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 25 हून अधिक मजूर घटनास्थळी काम करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) ट्विट करून ही माहिती दिली.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.