दिल्लीतील मुखर्जी नगर येथील कोचिंग सेंटरला आग लागली. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या मुलांनी तिसऱ्या मजल्यावरील खिडक्या आणि बाल्कनीतून उडी मारून आपला जीव वाचवला. यात काही विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त आहे. बत्रा सिनेमाजवळ ग्याना बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने काही विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे.
आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थी वायरच्या साहाय्याने खिडकीतून खाली उतरताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या मजल्यावरील इलेक्ट्रिक मीटरमध्ये ही आग लागली. आग मोठी नसली तरी धुराचे लोट उठल्यानंतर मुले घाबरली आणि इमारतीच्या मागच्या पॅसेजने खाली उतरू लागली. अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही.
या इमारतीत काही विद्यार्थी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, आम्हाला मुखर्जी नगरमधील एका इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाली होती. आग विझवण्यासाठी आम्ही 11 गाड्या पाठवल्या होत्या. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.