Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 6 April 2025
webdunia

हवामान चेतावणी -मान्सूनची पुढे वाटचाल, मुसळधार पावसाची शक्यता

Weather warning - Monsoon ahead
, रविवार, 6 जून 2021 (18:24 IST)
नवी दिल्ली. दक्षिण-पश्चिम मान्सूनने 3 जून रोजी देशात आगमन केले आहे.आता ते वेगाने पुढे वाढत आहे. अरबी समुद्राचा मध्य भाग, संपूर्ण तट कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर सुदूर कर्नाटकचा काही भाग, तेलंगणा व आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा बहुतांश भाग, बंगालच्या मध्य उपसागराचा अधिक भाग व ईशान्येकडील काही भाग. बंगालच्या उपसागराकडे वाटचाल करत आहे.
 
भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) च्या म्हणण्यानुसार, येत्या 24तासांत अरबी समुद्राचे अधिक भाग, महाराष्ट्राचा अधिक भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेश आणि तेलंगानाचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, मध्य व ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारताकडे जाण्याचा अंदाज आहे.
 
खालील भागाच्या दक्षिण -पश्चिम वेगाने वाहणाऱ्या वाऱ्या मुळे येत्या 5 दिवसात पूर्वोत्तर राज्यात पाऊस येण्याची शक्यता आहे.तर अरुणाचल प्रदेश मध्ये 5 ,6,8 जून रोजी ,आणि असम आणि मेघालय मध्ये 5 -9 जून 
पर्यंत आणि नागालँड ,मणिपूर,मिजोराम आणि त्रिपुरात वेगवेगळ्या ठिकाणी 5 -7 जून दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 
 
केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक येथे येत्या 24 तासांत गडगडाटासह विजांचा कडकडाट व वादळी वार्‍याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र ते दक्षिण केरळ किनाऱ्या वरील समुद्राच्या कमी दाबामुळे आणि कमी ट्रॉपोस्फियर पातळीवर पश्चिमेकडील वारा बळकट होण्याची शक्यता आहे.तसेच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता आहे.
 
राष्ट्रीय हवामान ब्युरोने देखील अशी माहिती दिली आहे की चक्रीय परिभ्रमण स्वरूपात पश्चिमी विक्षोभ पंजाब आणि त्याला लागून हरियाणाच्या समुद्रसपाटीपासून 3.1 किमी उंच असून त्याचा अक्षावर  
5.8 किमी उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र आहे. जे समुद्रसपाटीपासून 72 अंश पूर्व अक्षांश आणि 26 अंश उत्तर रेखांश येथे स्थित होते. या व्यतिरिक्त, हरियाणा आणि लगतच्या पश्चिमी राजस्थानमध्ये चक्रीय चक्राकार प्रवाह सुरू आहे.
 
त्याच्या प्रभावाखाली, पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि उत्तर-पश्चिम भारताच्या आसपासच्या मैदानावर तसेच  येत्या 48 तासात वादळी वाऱ्यासह गडगडाहट,विजांचा कडकडाहटसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे,तर उत्तर भारतातील मैदानी भागास 8 आणि 9 जून रोजी 25 -35 किमी प्रतितास वेगाने वार वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने असा अंदाज वर्तविला होता की उत्तर भारत आणि दक्षिण भारतात मान्सून सामान्य, मध्य भारतात सामान्य आणि पूर्वेकडील आणि ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी राहील.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना अनलॉक-मुंबईकर पुन्हा लालपरीत प्रवास करतील