Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

#WebViral 8 मुस्लिमांनी केले हिंदू वृद्ध व्यक्तीचे अंतिम संस्कार

#WebViral 8 मुस्लिमांनी केले हिंदू वृद्ध व्यक्तीचे अंतिम संस्कार
, बुधवार, 7 सप्टेंबर 2016 (11:13 IST)
एका मुस्लिम सदस्य ग्रुपनं अनोळखी हिंदू वृद्ध व्यक्तीचे अंतिम संस्कार हिंदू धर्मानुसार केले. त्यांच्या ह्या कार्याची सोशल मीडियावर फार प्रशंसा होत आहे. त्या व्यक्तीचा मृत्यू मध्यरात्री एका सुनसान जागेवर झाला होता.   
 
महाराष्ट्रात मंबराच्या मुस्लिम युवकांनी माणुसकीच्या नात्याने हे कार्य केले. 65-वर्षीय  कदम यांचा मृत्यू मध्यरात्री कौंसामध्ये झाला होता. त्यांच्या अंतिम संस्कारासाठी त्यांची वृद्ध बायकोशिवाय कोणी नव्हते. अशात 8 सदस्य असणार्‍या एका ग्रुपने त्यांच्या अंतिम संस्काराची जबाबदारी स्वत:वर घेतली.  
 
रिपोर्टनुसार, त्यांनी हिंदू मान्यतेनुसार लागणारे सर्व गरजेचे सामान विकत घेतले आणि चिता तयार केली. त्यानंतर सकाळी 3 वाजता, मृत शरीराला स्मशानात घेऊन गेले. जेथे त्या व्यक्तीचे अंतिम संस्कार करण्यात आले.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतीला अखंड 12 तास वीज