अलीकडेच बिहार येथील शिक्षा क्षेत्रात मोठा घोटाळा समोर आला होता. आता गुजरातमध्ये असेच काही तरी शिजताना दिसत आहे.
गुजरात येथील दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांना हेदेखील माहीत नाही की त्रिकोण आणि गोलाकार यात काय अंतर आहे ते. यात विशेष म्हणजे हे माहीत नसणारे विद्यार्थी कमजोर नसून 90 टक्के मार्क मिळवणारे आहे. काही विद्यार्थ्यांप्रमाणे त्रिकोणात चार बाजू असतात तर काही अंक ओळखू शकण्यातदेखील अक्षम ठरले. असेही काही विद्यार्थी होते ज्यांना सामान्य बेरीज आणि वजाबाकी करता आले नाही.
याहून आश्चर्याची बाब म्हणजे काही विद्यार्थ्यांप्रमाणे सीसीटीव्ही कॅमर्यासमोर शिक्षकाने त्यांना अचूक उत्तर सांगितली आणि काही उत्तर खिडकीतून येत असलेल्या आवाजाने स्पष्ट झाली.
तसेच शिक्षक हे आरोप नाकारत आहे. त्याच्याप्रमाणे विद्यार्थ्यांना तीन महिन्याच्या सुट्टीत शिकवलेल्या विषयांचा विसर पडला आहे.