Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ममता दीदी महाराष्ट्र दौऱ्यावर

ममता दीदी महाराष्ट्र दौऱ्यावर
, मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (21:47 IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या तीन दिवसी दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या आहेत. त्यांनी दौऱ्याची सुरूवात करतांना श्री सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 
 
यावेळी त्यांनी माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली. बॅनर्जी म्हणाल्या, “मागे जेव्हा मी मुंबईत आले होते तेव्हा इथे येण्यास जमलं नव्हतं. त्यामुळे मी यंदा दर्शनास जाण्याचं ठरवलं होतं. आमच्या घरी देखील गणपती पूजा होते. मी मंदिर समितीची, पुजाऱ्यांची आणि महाराष्ट्र शासनाची आभारी आहे. मी सर्वांसाठी प्रार्थना करण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. मला अतिशय छान वाटलं. इतक्या चांगल्याप्रकारे या लोकांनी मला दर्शन घडवण्यासाठी व्यवस्था केली. मी अतिशय आनंदी आहे, जय मराठा.. जय बांगला… ”
 
या मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचे देखील त्यांचे नियोजन होते, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांची भेट होणार नाही.  परंतु, राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बैठक होणार आहे
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा