Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतरत्न पुरस्कार आहे तरी काय, संपूर्ण महिती जाणून घ्या

भारतरत्न पुरस्कार आहे तरी काय, संपूर्ण महिती जाणून घ्या
, बुधवार, 22 फेब्रुवारी 2023 (16:01 IST)
भारतरत्न पुरस्कार हा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहतो तर स्वतंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या अशी मागणी नेहमी होते आता यावेळी, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिल्यानंतर आता शिंदे गटाने कंबर कसली आहे. राज्यातील विधिमंडळ आणि संसदेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाचे ठराव करण्यात आले. याविषयी मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना माहिती दिली.
 
 या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एकमताने पक्षाचा प्रमुख नेता म्हणून जाहीर करण्यात आले. या बैठकीत ठराव संमत करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी मांडला. शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचा पाठपुरावा केंद्राकडे केला जाईल, असेही या बैठकीत ठरल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
 
 त्यामुळे आता आपण जाणून घेऊया कि भारतरत्न पुरस्कार आहे तरी काय , पूर्ण महिती ..........
भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान
भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरवायचे, असा निर्णय इ.स. १९५४ मध्ये तत्कालीन भारत सरकारतर्फे घेण्यात आला २ जानेवारी १९५४ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यावर मान्यतेची मोहर उठवली. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर १२हून अधिक जणांना मरणोपरान्त भारतरत्‍न दिले गेले आहे. २०१४ मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले.
 
भारतरत्न देण्याची सुरुवात किती सालापासून सुरू झाली?
भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २१ जानेवारी १९५४ पासून झाली. भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप सूर्याची प्रतिकृती आणि देवनागरी लिपी मध्ये भारतरत्न लिहिलेले ब्राँझ धातू पासून बनवलेल्या पिंपळाच्या पानाचा आकार असलेले स्मृतिचिन्ह राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली सनद आणि गळ्यात घालण्याचे पदक अशा स्वरुपात दिले जाते.
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला?
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 31 मार्च 1990 रोजी मरणोत्तर भारतरत्न सन्मान करण्यात आला होता. प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त तीन भारतरत्न पुरस्कार विजेत्याना दिले जाते.
 
भारतरत्न पुरस्कार हे फक्त भारतीय रहिवासींना न देता भारताबाहेरील व्यक्ती ज्यांनी भारत देशासाठी खूप मोलाची कामगिरी केली आहे त्यांना देखील दिले जाते जसे कि खान अब्दुल गफार खान, हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होते.
 
भारतरत्न पुरस्कारासाठी नामनिर्देशिताची निवड हि त्याच्या पद, व्यवसाय, लिंग, जातीवरून न ठरवता त्याच्या उत्तम कामगिरीसाठी केली जाते.
 
प्रथम भारतरत्न पुरस्कार हे चक्रवर्ती राजगोपालाचारी (भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (भारताचे पहिले उपराष्ट्रपती) आणि डॉ. चंद्रशेखर वेंकट रामन (भौतिकशास्त्रज्ञ) याना मिळाले.
 
इंदीरा गांधी या पहिल्या महिला होत्या, ज्यांना १९७१ मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं. इंदीरा गांधी या भारतातील तिसऱ्या पंतप्रधान होत्या.
 
मदर तेरेसा याना २५ जानेवारी, १९८० मध्ये संपूर्ण आयुष्यभर केलेल्या समाजसेवेमुळे भारतरत्न हे पुरस्कार मिळाले.
 
१९५५ मध्ये हे पुरस्कार मरणोत्तर देखील देण्याचे निश्चित करण्यात आले, आणि आजपर्यंत १४ जणांना हे पुरस्कार मरणोत्तर देण्यात आले.
 
भारतरत्न पुरस्काराचा गैर वापर केल्यास विजेत्याकडून भारतरत्न पुरस्कार परत घेण्याचा अधीकार भारतातील राष्ट्रपती कडे असतो.
 
भारतरत्न पदक
भारतरत्न पदक हे अलिपूर मिंट, कोलकाता येथे बनविले जाते. हे पदक पिंपळाच्या पानाच्या आकाराच्या असते, जे कांस्य धातूचे असते आणि यावर समोरच्या बाजूस किरणांसोबत असणारे सूर्याचे चित्र असते, जे प्लॅटिनम धातूपासून बनलेले असते व त्याखाली “भारत रत्न” असे पित्तल धातूपासून बनलेले शब्द असते.
 
पदकाच्या मागच्या बाजूस देखील प्लॅटिनम धातूपासून बनलेले भारताचे राजकीय चिन्ह असते आणि त्याचप्रमाणे त्या खाली “सत्यमेव जयते” असे पित्तल धातूपासून बनलेले शब्द असते.
 
हे पदक आकारामध्ये २.३ इंच इतके लांबीमध्ये आणि १.९ इंच इतके रुंदीमध्ये असते आणि या पदकाला सफेद रंगाची कापडी रिबीन असते.
 
भारतरत्न पुरस्काराची सुरवात ६८ वर्ष अगोदर १९५४ पासून झाली व त्यावर्षापासून २०१९ वर्षापर्यँत एकूण ४८ पुरस्कार विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात आली. भारत सरकारकडून भारतरत्न पुरस्कारार्थीला अनेक सुविधा दिल्या जातात.
 
भारतरत्न पुरस्कार समारंभ सोहळा न्यू दिल्ली मधील राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित केले जाते व हे पुरस्कार राष्ट्रपती कडून त्या विजयी नामांकिताना दिले जाते.
 
भारतरत्न पुरस्कार सुरूवातीला म्हणजे १९५४ मध्ये पुढील व्यक्तींना बहाल करण्यात आला.
 
१) सी राजगोपालचारी
२) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
३) सी व्ही रमण
आज पर्यंत भारत रत्न पुरस्कार मरणोत्तर सुद्धा बहाल करण्यात आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार मिळालेली पहिली व्यक्ती लाल बहादूर शास्त्री हे होते. 
आज पर्यंत दोन परदेशी व्यक्तींना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे.
खान अब्दुल गफार खान यांना १९८७ मध्ये तर नेल्सन मंडेला यांना १९९० मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
 
भारतरत्न पुरस्कार विजेते राष्ट्रपती
१) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन  –  १९५४
२) डॉक्टर राजेंद्र प्रसाद  – १९६२
३) झाकीर हुसेन  – १९६३
४) वराहगिरी वेंकट गिरी  – १९७५
५) डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम  – १९९७
६) प्रणव मुखर्जी  – २०१९
 
राष्ट्रपती पुरस्कार हा आतापर्यंत पाच महिलांना मिळाला आहे 
१) इंदिरा गांधी   -१९७१ 
२) मदर तेरेसा   -१९८० 
३) अरुणा आसफ अली  – १९९७ 
४) एम एस   सुब्बुलक्ष्मी  – १९९८ 
५) लता मंगेशकर  – २००१ 
 
राष्ट्रपती पुरस्कार आतापर्यंत सात पंतप्रधानांना मिळाला आहे 
१) पंडित जवाहरलाल नेहरू – १९५५ 
२) लालबहादूर शास्त्री – १९६६ 
३) इंदिरा गांधी – १९७१ 
४) मोरारजी देसाई – १९९१ 
५) गुलजारी लाल नंदा – १९९७ 
६) राजीव गांधी – १९९१ 
७) अटल बिहारी वाजपेयी – २०१५ 
 
आजपर्यंत सर्वाधिक भारतरत्न रत्न पुरस्कार प्राप्त नागरिक महाराष्ट्र राज्याचे आहेत. महाराष्ट्रातील एकूण नऊ व्यक्तींना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागतो. उत्तर प्रदेश राज्य एकूण आठ व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. 
 
२०१९ चे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतातील रत्ने 
१) प्रणव मुखर्जी 
२) भूपेन हजारिका 
३) नानाजी देशमुख 
 
२०१९ चा भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख भूपेन हजारिका यांना मरणोत्तर मिळालेला आहे.
भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती 2021
१) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  
२) चक्रवर्ती राजगोपालचारी
३) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण
४) डॉ. भगवान दास 
५) सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
६) पंडित जवाहरलाल
७) नेहरू गोविंद वल्लभ पंत
८)  महर्षी धोंडो केशव कर्वे 
९) बिधान चंद्र रॉय 
१०) पुरुषोत्तम दास टंडन 
११) डॉ. राजेंद्र प्रसाद 
१२) डॉ. जाकिर हुसैन 
१३) डॉ. पांडुरंग वामन काणे 
१४) लाल बहादूर शास्त्री 
१५) इंदिरा गांधी 
१६) वराहगिरी वेंकट गिरी 
१७) के कामराज 
१८) मदर तेरेसा 
१९) आचार्य विनोबा भावे 
२०) खान अब्दुल गफार खान 
२१) मुर्दुर गोपाला रामचंदम  
२२) भीमराव रामजी आंबेडकर 
२३) नेल्सन मंडेला 
२४) राजीव गांधी 
२५) सरदार वल्लभभाई पटेल 
२६)मोरारजीभाई देसाई 
२७) मौलाना अबुल कलाम आझाद 
२८) जहांगीर रतनजी दादाभाई टाटा 
२९) सत्यजित रे  
३०)एपीजे अब्दुल कलाम 
३१) गुलजारी लाल नंदा 
३२) अरुणा असिफ अली 
३३)एम एस सुब्बलक्ष्मी 
३४)सि. सुब्रमण्यम 
३५)जयप्रकाश नारायण  
३६) पंडित रविशंकर 
३७) अमर्त्य सेन 
३८) गोपीनाथ बोरदोलोई 
३९) लता मंगेशकर 
४०) उस्ताद बिस्मिल्ला खा 
४१)पंडित भीमसेन जोशी 
४२)सचिन तेंडुलकर 
४३) सी एन आर राव 
४४)अटल बिहारी वाजपेयी 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bird Flu चे रुग्ण समोर आल्यानंतर सरकारचा इशारा, लोकांना चिकन न खाण्याचे आवाहन