Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता, कपाटात सापडले 142 कोटी रुपये ,आयकर विभागाचा छापा पडला,अधिकारी चक्रावले

काय सांगता, कपाटात सापडले  142  कोटी रुपये ,आयकर विभागाचा छापा पडला,अधिकारी चक्रावले
, सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (11:50 IST)
आयकर विभागाने हैदराबाद मधील हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवर छापा टाकला. कॅश ऑफिसच्या कपाटात 142 कोटी रुपये पडलेले आढळल्यावर छापा टाकणारे अधिकारी चक्रावून गेले.
 
आयकर विभागाने हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवर छापा टाकला. कॅश ऑफिसच्या कपाटात 142 कोटी रुपये ठेवलेले आढळल्यावर छापा टाकणारे अधिकारी चक्रावून गेले. ही कंपनी बहुतांश उत्पादने परदेशात निर्यात करते म्हणजे अमेरिका, युरोप, दुबई आणि इतर आफ्रिकन देश.आयकर विभागाने 6 राज्यांमध्ये सुमारे 50 ठिकाणी शोध मोहीम राबवली होती.  
 
शोध दरम्यान, खात्यांची पुस्तके आणि रोख रकमेचा दुसरा संच सापडलेल्या ठिकाणांची ओळख पटली. डिजिटल साधने, पेन ड्राइव्ह, कागदपत्रे इत्यादी स्वरूपात अनेक पुरावे सापडले आहेत, ज्यांना जप्त करण्यात आले आहे. या छाप्यांदरम्यान बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून केलेल्या खरेदीतील अनियमितताही उघडकीस आली. या व्यतिरिक्त छाप्यात जमीन खरेदीसाठी पैसे भरल्याचा पुरावा देखील हाती लागला आणि इतर अनेक कायदेशीर पुरावे आढळले. 
 
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, हैदराबाद येथील एका अग्रणी फार्मास्युटिकल कंपनीवर 6 ऑक्टोबर रोजी शोधमोहीम राबवण्यात आली आणि आतापर्यंत सुमारे550 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे. अघोषित उत्पन्न शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे .
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Viral चेन्नई संकटात असताना ती मुलगी जोरजोरात रडत होती, सामन्यानंतर धोनीने दिली भेट