Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोण आहे आतिशी मार्लेना? आमदार ते मुख्यमंत्री पर्यंतचा प्रवास जाणून घ्या

Atishi Marlena
, मंगळवार, 17 सप्टेंबर 2024 (13:36 IST)
देशाची राजधानी दिल्लीला मुख्यमंत्रीपदासाठी नवीन चेहरा मिळाला आहे. आतिशी मार्लेना यांच्या नावाची निवड झाली असून आता त्या मुख्यमंत्रीपदी कारभार सांभाळणार आहे. आप ने याची घोषणा केली आहे. 
 
आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होणार आहेत. आतिशी हे अरविंद केजरीवाल मंत्रिमंडळातील सर्वात शक्तिशाली मंत्री आहे. या अरविंद केजरीवालांच्या जवळच्या आणि विश्वासू मंत्री मानल्या जातात. त्या अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून  संघटनेत सक्रिय आहे. सध्या त्यांच्याकडे सर्वाधिक मंत्रीपदे आहे. विधिमंडळाच्या पक्षाच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांचा नावाचा प्रस्ताव पुढे ठेवला सर्व आमदारांनी त्याला पाठिंबा दिला आणि आतिशी मार्लेना या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनल्या आहे. 
 
कोण आहे आतिशी मार्लेना -
आतिशी या पंजाबी कुटुंबातील आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीत झाले. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर आहे. आम आदमी पार्टीच्या महिला नेत्या आतिशी एक होतकरू विद्यार्थिनी आहे, एक उत्कृष्ट शिक्षिका आहे आणि शैक्षणिक पात्रतेतही अव्वल आहे. त्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी त्यांची ओळख आहे. दिल्लीच्या सरकारी शाळांच्या सुधारणेचे सर्वात मोठे श्रेय आतिशी यांना दिले जाते. त्या आपच्या राजकीय व्यवहार समितीच्या सदस्याही आहेत.

आतिशीचा जन्म 8 जून 1981 रोजी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक विजय कुमार सिंह आणि तृप्ता वाही यांच्या घरी झाला. आतिशीनी  स्प्रिंगडेल स्कूल, नवी दिल्ली येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. आतिशीने सेंट स्टीफन कॉलेजमध्ये इतिहासाचा अभ्यास केला. त्यानंतर चेव्हनिंग शिष्यवृत्तीवर ऑक्सफर्ड विद्यापीठात पदव्युत्तर पदवी मिळाली. काही वर्षांनी त्यांनी ऑक्सफर्ड मधून शैक्षणिक संशोधनात रोड्स स्कॉलर म्हणून दुसरी पदव्युत्तर पदवी मिळवली

आतिशी यांनी 2013 मध्ये आम आदमी पार्टीमधून राजकीय प्रवास सुरू केला. जुलै 2015 ते एप्रिल 2018 पर्यंत त्या मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार होत्या. यानंतर, 2019 मध्ये, आतिशीने पूर्व दिल्लीच्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवली पण त्यांचा गौतम गंभीरकडून पराभव झाला.

मात्र, 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक जिंकून आमदार झाल्या.9 मार्च 2023 रोजी आतिशी दिल्लीच्या आदमी पक्षाच्या सरकार मध्ये पहिल्यांदा मंत्री बनल्या. त्यांच्या कडे सध्या 13 मंत्रालये आहेत. त्या आम आदमी पक्षाच्या सर्वात बोलत्या प्रवक्त्या मानल्या जातात. 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप आमदार ट्रेनसमोर रुळावर पडल्या, व्हिडिओ व्हायरल