Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खरा चाणक्य कोण तुम्ही की शरद पवार?

खरा चाणक्य कोण तुम्ही की शरद पवार?
नवी दिल्ली , शनिवार, 15 फेब्रुवारी 2020 (13:28 IST)
विधानसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर अमित शहा यांनी पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनाला मुलाखत दिली. यामध्ये तुम्हाला राजकारणातील चाणक्य म्हटले जाते, तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला. असे विचारतानाच राजकारणातील खरे चाणक्य तुम्ही की शरद पवार असा थेट प्रश्नही केला गेला. यावर शहा यांनी दिलेले उत्तर सध चर्चेचा विषय ठरत आहे.
 
दिल्लीमधील भाजपच दारूण पराभवानंतर शहा यांची जादू फिकी झाल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. दोन वर्षांत सहा राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर शहा यांच्या चाणक्यनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीच्या आधी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजप सत्तेपासून वंचित राहिला आहे. यामध्ये पवारांची भूमिका मोठी होती. त्या धर्तीवरच खरे चाणक्य कोण? तुम्ही की शरद पवार?
 
महाराष्ट्रातील निकालानंतर राजकारणातील चाणक्य शरद पवार आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर शहा यांनी उत्तर देताना म्हटले की, मी चाणक्यनीती खूप वाचली आहे. ती समजूनघेण्याचा प्रयत्नही केला आहे. चाणक्य यांच्याइतका मी महान नसून तसा विचारही करू शकत नाही. भगवान कौटिल्य (चाणक्य) यांच्याशी होणार्‍या तुलनेबाबत मी विचारही करू शकत नाही. पवारांबाबत बोलाय चे झाल्यास ते दिग्गज राजकीय नेते आहेत. त्यांनी अनेक सरकारे पाडली आहेत. नवीन सरकारे स्थापनही केली आहेत. सध्या शहा यांची ही मुलाखत आणि चाणक्याशी तुलना केल्यावर दिलेले उत्तर व्हारल झाले असून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 
 
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला 161 जागा मिळाल्या होत्या  पण निकालानंतर मुख्यमंत्रिपदामुळे दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि युती तुटली. युती तुटल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रपणे सरकार स्थापन केले. यामध्ये पवार यांची भूमिका मोठी होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमृता फडणवीस यांचे ‘हॅलो’ गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल