Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

मिस्टर किसींग कोण होता?

exam
, सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (21:53 IST)
सीबीएसई शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सोमवार, २७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. प्रश्नपत्रिकेच्या सेक्शन ‘सी’च्या ‘लिटरेचर’वरील प्रश्नात ‘मिस्टर किसींग कोण होता? असा प्रश्न होता. उत्तरादाखल चार पर्याय दिले होते. त्यातील एक निवडायचा होता. तो इंग्रजीचा, सोशल सायंसचा शिक्षक, वार्डन आणि प्रिंसीपल होता, असे त्या चार पर्यायांत नोंदवले गेले होते. पाठ्यपुस्तकातील धड्यात तो व्यक्ती गणिताचा शिक्षक असल्याचे नमूद आहे. मात्र, गणित हा विषय पर्यायात नसल्याने विद्यार्थी गोंधळात पडले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध पर्यायापैकी एक पर्याय निवडला. मात्र, पर्यायच चुकीचे असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवला, त्यांना गुण देण्यात यावे, अशी मागणी आता होत आहे.बोर्डाच्या बारावी परीक्षेत एक मोठी चूक नुकतीच उघडकीस आली होती. यानंतर बोर्डाकडून त्याचे सहा गुण जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ आता सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेतही अशी चूक झाल्याने एकूण परीक्षेच्या यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाचे दागिने भामट्याने केले लंपास