Sawan posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 July 2025
webdunia

रेल्वेच्या जनरल डब्यात महिलेची प्रसूती बाळ दगावले

Jodhpur - Delhi Sarai Rohilla SF Express
, शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 (12:12 IST)
जोधपूर- दिल्ली सरायरोहिल्लाच्या एका जनरल कोचच्या डब्यात एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली त्याच ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला डॉक्टरने महिलेचा जीव वाचवला मात्र तिचे बाळ दगावले. महिलेला सात महिन्यांचा गर्भ होता.

सदर घटना बुधवारी रात्री 11:40 वाजता ट्रेन रतनगड स्थानकातून सुटल्यावर तातडीनं चेन पुलिंग केली. रेल्वेत टीसीने चेन पुलिंगची माहिती घेत असताना त्यांना जनरल डब्यात एका महिलेला प्रसूती वेदना होत असलेली महिला दिसली. टीसीने लगेच एसी कोच मध्ये प्रवास करीत असलेल्या महिला डॉक्टरांना बोलावले.

डॉक्टरने महिलेची प्रसूती केली आणि महिलेचा जीव वाचवला. मात्र दुर्देवाने त्या बाळाला वाचवू शकल्या नाही. बाळ सात महिन्यांहून कमी वयाचे होते. महिलेला रतनगड स्टेशनवर उतरवून रुग्णवाहिकेने रुग्णालयात पाठविले आणि दिल्लीला जाणारी ट्रेन दीड तास उशिरा निघाली.  
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Smile Day 2024: आज जागतिक स्माईल डे, कसा साजरा करायचा जाणून घ्या