Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

DTC बसमध्ये महिलांची मारहाण, व्हिडीओ व्हायरल

DTC Bus fight
, बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (15:10 IST)
दिल्ली मेट्रोचे दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मेट्रोमध्ये सीटवरून महिलांचे भांडण होण्याचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता यावेळी डीटीसी बसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही महिला सीटवरून आपापसात भांडताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
 
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा नसून डीटीसी बसचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की दोन महिला एकमेकींचे केस ओढून भांडण करताना दिसत आहे. काही लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भांडताना पाहून काही मुलांनी रडायला सुरु केले. 
 
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर @gharkekalesh नावाच्या पेजने शेअर केला आहे. 

व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये ही लढत सीटवरून होत असल्याचं म्हटलं आहे. वृत्त लिहेपर्यंत 76 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PM Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर