स्पाइसजेटच्या एअरलाइनच्या एका फ्लाइटमध्ये क्रू मेंबरच्या निष्काळजीपणामुळे एक महिलेच्या मांडीवर गरम पाणी सांडलं. गरम पाणी सांडल्यामुळे महिलेच्या शरीरावर डाग पडून गेले. महिलेला उपचारासाठी कोचीन एअरपोर्टवर थांबावे लागले.
ही घटना 28 मार्च रोजीची आहे. मुंबईहून कोचीन जाणार्या फ्लाइट एसजी- 153 मध्ये एक अटेंडेंटने एका वरिष्ठ नागरिकाला उकळलेले पाणी सर्व्ह केलं. ते पाण्याचा ग्लास सांभाळू शकले नाही गरम पाण्याचा तो ग्लास शेजारी बसलेल्या महिलेच्या मांडीवर सांडला. यामुळे महिलेची जांघ 20 टक्के बर्न झाली. महिलेला उपचारासाठी कोचीन एअरपोर्टवर थांबावे लागले. महिलेने मेल करून एअरलाइन्सकडून भरपाई मागितल्यावर एअरलाइन्सने माफी मागितली पण भरपाई देण्यास नकार दिला.
पीडित महिलेनुसार गरम पाण्यामुळे तिच्या मांडीवर जखम झाल्यामुळे ती उठण्यात सक्षम नव्हती तरी क्रू मेंबरने तिची मदत केली नाही. मला फक्त बर्फ देण्यात आलं आणि मी अनाउंसमेंट करण्याची विनंती केली ज्याने विमानात डॉक्टर असल्यास फर्स्ट ऍड मिळेल तरी त्यांनी अनाउंसमेंट देखील केली नाही.
महिलेप्रमाणे दोन जागी जखमा झाल्या आणि तेथील मास देखील दिसू लागला. लँडिंग दरम्यान देखील क्रू मेंबरने मदत केली नाही आणि मला स्वत:ला सामान घेऊन बाहेर पडावे लागले. यावर महिलेला मदत ऑफर करण्यात आली असून त्यांनी स्वत: नकार दिल्याचे क्रू मेंबरने स्पष्टीकरण दिले.