योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. योगी उत्तर प्रदेशचे 21वें मुख्यमंत्री झाले आहेत. यावेळी बीजेपी प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. लखनऊचे महापौर डॉ. दिनेश शर्मा यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दिनेश शर्मा पीएम मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात.यावेळी एकूण 44 मंत्री शपथ घेणार असून यामध्ये 22 कॅबिनेट मंत्री, 15 राज्य मंत्री आणि 9 स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मोहसिन रझा या एकमेव मुस्लीम चेहऱ्याचा समावेश आहे. शपथग्रहण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित आहेत.