Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

India
, मंगळवार, 21 मे 2024 (14:34 IST)
बिहारमधील छपरामध्ये मतदानानंतर भाजप आणि राजद कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पाहता पाहता लोकांना गोळी मारण्यात आली. यामध्ये एकाच मृत्यू झाला आहे तर इतर दोन जण जखमी झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन लोकांना अटक केली आहे. इथे लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांचा सामान भाजप नेता राजीव प्रताप रूढी यांच्यासोबत आहे. 
 
पोलीस अधीक्षक गौरव मंगला यांनी सांगितले की, काल छपरा येथील बूथ संख्या 18-19 च्या बाहेर 2 पक्षांमध्ये वाद झाला. त्या प्रकरणातच आज काही असामाजिक तत्वांनी 3 लोकांवर फायरिंग केले. यामध्ये एकाच मृत्यू झालेला आहे. तर इतर दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आपले आहे. पोलिसांनी मृत पावलेल्या व्यक्तीला पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. 
 
बिहारचे पूर्व मुख्यमंत्री आणि राजद नेता तेजस्वी यादव म्हणाले की , निवडणुकीमध्ये हिंसेला जागा नको. प्रशासनाच्या लोकांशी आमचे बोलणे झाले आहे. फायरिंग करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने मला सांगितले आहे की, बाकी दोघांना देखील पकडण्यात येईल. काही लोक असे असतात की, जे हार झाल्यामुळे आक्रमक होतात व असे काम करतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव