Publish Date: Tue, 29 Sep 2015 (11:32 IST)
Updated Date: Tue, 29 Sep 2015 (11:35 IST)
मंगळ ग्रहावर द्रवस्वरुपात पाणी असल्याचे नासाने जाहीर केले. प्रवाहीत स्वरुपात असलेले पाणी हे शीरयुक्त असण्याची शक्याता वर्तवली जात आहे.
नासाच्या अवकाश यानाने यासंदभार्तील छायाचित्रे व अन्य स्वरुपातील माहिती संकलित केली आहेत. जिथे पाणी असते तिथे जिवसृष्टी असण्याची शक्याता आहे असेही नासाने स्पष्ट केले. नासाच्या या प्राथमिक स्वरुपाच्या अंदाजामुळे भविष्यात मंगळ ग्रहावर मन्युष्य वस्ती बसण्याची शक्याता आहे. आता मंगळावर माणूस पाठवून निरीक्षण करण्याचे नियोजन होण्याची शक्यता आहे.