नवी दिल्ली- जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) करार न मानणार्या अमेरिकेविरूद्ध भारत 16 खटले दाखल करणार आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेचे काही कार्यक्रम जागतिक नियमांविरूद्ध आहेत अशी माहिती सरकारतर्फे संसदेत मांडण्यात आली.
जागतिक व्यापार संघटनेच्या कराराचे पालन न केल्यामुळे भारत अमेरिकेविरुद्ध 16 खटले दाखल करणार आहे का? असा प्रश्न राज्यसभेत विचारण्यात आला होता. त्यावर वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे सत्य आहे, असे उत्तर दिले.
अमेरिकेचे अक्षय ऊर्जा क्षेत्रात असे काही कार्यक्रम आहेत, जे जागतिक नियमांना मोडणारे आहेत असे भारताला आढखले असल्याचे सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितले. विशेषत: ‘गॅट 1994’ अंतर्गत येणारे नियम अमेरिकेने मोडले आहेत अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
भारताने या प्रकरणी विवाद निवारण पॅनलच्या अहवाल आणि शिफारसींनुसार जागतिक व्यापार संघटनेत तक्रार दाखल केली असल्याची माहितीही सीतारामन यांनी दुसर्या एका उत्तरात दिली आहे.