Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आधारकार्डासह ‘जैश’च्या दहशतवाद्याला अटक

आधारकार्डासह ‘जैश’च्या दहशतवाद्याला अटक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरातील बारामुलामधून ‘जैश-ए-मोहम्मद’ च्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे भारतीय नागरिक असलेले आधारकार्ड मिळाले आहे. अब्दुल रहमान असे त्याचे नाव असून तो भारतात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती मेजर जनरल जे. एस. नैन यांनी दिली.
 
‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेशी त्याचे संबंध असून तो गेल्या दोन महिन्यात सातवेळा बारामुला येथे आला होता. मेजर जनलर नैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमानने बारामुला, सोपोर आणि कूपवाडा या ठिकाणी लोकांचा दहशतवादी कारवायामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न चालवला होता. अब्दुल रहमानने ‘आयएसआय’चे बालाकोटमध्ये प्रशिक्षण घेतले आहे, अशी माहिती मेजर जनरल यांनी दिली.
 
‘जैश-ए-मोहम्मद’ च्या चार साथिदारांसह अब्दुल रहमानने जानेवारी महिन्यात पाकिस्तानकडीन काश्मीर भागातून भारतात घुसखोरी केली होती. दहशतवादी संघटनेत नवीन मुलांचा समावेश करण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असताना जवानांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती मेजर जनरल यांनी दिली.
 
जवानांनी अटक केल्यानंतर अब्दुल रहमानकडे एक बनावट आधारकार्ड सापडले आहे. आधार कार्डचा नंबर 6478 5622 5315 असा असून आधारकार्डावर दहशतवाद्याचे नाव शब्बीर अहमद खान लिहिलेले असून वडिलाचे नाव गुलाम रसूल खान आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

६४० टनाचे अवाढव्य विमान भारतात उतरलं