Publish Date: Sat, 08 Nov 2014 (14:12 IST)
Updated Date: Sat, 08 Nov 2014 (14:16 IST)
हे ऐकून किंवा वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल, पण हे सत्य आहे. काही वेळासाठी आम आदमी पक्षाच्या ऑफिशियल वेबसाइटवर नरेंद्र मोदी यांचा फोटोही दिसला होता. फोटोवर लिहिले होते - 'देहली स्पीक, मोदी फॉर पीएम, अरविंद फॉर सीएम'. या फोटोत केजरीवाल आणि मोदी सोबत सोबत दाखवण्यात आले होते.
वेबसाइट उघडल्याबरोबरच जो पहिला स्लाइड येत होता, त्यात लिहिले होते ... दिल्ली म्हणाली, 'मोदी फॉर पीएम, केजरीवाल फॉर सीएम.' नंतर सोशल मीडियावर बरेच लोक या प्रश्नावर आवाज काढायला लागले तर पक्षाने ताबडतोब स्लाइड हटवले पण तोपर्यंत सोशल मीडियावर पक्षाची खिंचाई सुरू झाली होती.'
आम आदमी पक्षाने या स्लाइडच्या समर्थनास एक आर्टिकलही लिहिले होते नंतर ते काढण्यात आले. या आर्टिकलमध्ये लिहिले होते की दिल्लीच्या जनतेने निश्चय केले होते की त्यांना एक मजबूत पंतप्रधान हवे होते म्हणून त्यांनी मोदींची निवड केली. आता एक सशक्त मुख्यमंत्री हवे आहे ज्याने भ्रष्टाचार, महागाई, शाळा, ट्रांसपोर्ट आणि दवाखान्यासारख्या मुद्द्यांचे समाधान होणे शक्य होईल. आता त्यांना अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री म्हणून हवा आहे.
चित्रपट अभिनेता आणि भाजप सांसदने एक ट्विट केले - मित्रगण, तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका जर उद्या आम आदमी पक्षाची वेबसाइट हे क्लेम करेल की मोदी रेल्वेत चहा वाटत होते तो चहा केजरीवालच तयार करत होते.
वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता iTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर फ़ॉलो करू शकता.