Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आवाज-ए-पंजाब युतीस तार : नवज्योत

आवाज-ए-पंजाब युतीस तार : नवज्योत
नवी दिल्ली , गुरूवार, 22 सप्टेंबर 2016 (11:53 IST)
आवाज-ए-पंजाब हा राजकीय पक्ष नसल्याचे सांगत क्रिकेटपटू, विनोदवीर आणि राजकीय नेते असलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी बुधवारी इतर समविचारी गटांबरोबर आम्ही युती करण्यास तयार आहोत, असे सांगितले.
 
आवाज-ए-पंजाबमुळे पुढील वर्षी पंजाबमध्ये होणार्‍या निवडणुकांमधील सरकारविरोधी मते विभागली जातील, असा आरोप सिद्धू यांनी फेटाळून लावला. पंजाबमधील शिरोमणी अकाली दल व भारतीय जनता पक्षाच्या सरकारला पराभूत करण्यासाठी इतरांना साथ देण्याच्या सिद्धूच्या या निर्णयास माजी हॉकीपटू परगतसिंग यांनीही पा¨ठबा दिला आहे. अकाली दल-भाजप युतीस पराभूत करुन कारभार घसरलेल्या पंजाबला परत रुळावर आणण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व करू, असे परगतसिंग यांनी म्हटले आहे.
 
भाजपमधून गेल्या 14 सप्टेंबर रोजी औपचारिकरित्या बाहेर पडल्यानंतर सिद्धू यांनी आवाज-ए-पंजाब या बिगरराजकीय गटाची घोषणा केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डान्सबार नवीन कायद्यास सुप्रीमची स्थगिती नाही