उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षा काँग्रेसचे हरीश रावत यांच्या नेतृत्वातील सरकारने जिंकली. हरीश रावत यांच्या बाजूने ३३ तर भाजपाच्या बाजूने २८ मते मिळाली. विधानसभेच्या कामकाजासंबंधीचा गोपनीय अहवाल सादर झाल्यानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालय निकालाची अधिकृत घोषणा करणार आहे.
मतदानाच्या आधी काँग्रेसच्या रेखा आर्य भाजपाच्या गटात दाखल झाल्या, तर भाजपाने निलंबित केलेले बंडखोर आ. भीमलाल आर्य काँग्रेसच्या कळपात गेले.
बसपा तसेच अन्य चार सदस्यांनी रावत यांच्या बाजूनेच मतदान केले. काँग्रेसचे २७ व हे ६ मिळून ३३ हा जादुई आकडा मिळवण्यात रावत सरकार यशस्वी ठरले.