बारमेर- या वेळेस उन्हाळा चांगलाच तापदायक ठरत आहे. मनुष्य ते जनावरंही यामुळे त्रस्त आहे. उष्णतेमुळेच राजस्थान येथील बारमेरमध्ये एका उंटाला वेड लागले आणि त्याने आपल्या मालकाचे डोके चावून घेतले. त्याने इतका वाईट रित्या डोके आपल्या तोंडात धरले की मालकाचे डोळे, नाकासह सर्व अवयव चेहर्यावरून पृथक झाले.
बारमेरजवळ मांगता गावात शेतकरी उर्जाराम यांच्या उंट उष्णतेमुळे बिथरून गेला. गावकर्यांचे म्हणणे आहे की उंट कित्येक तास उन्हात बसला होता, जेव्हा मालक त्याला आत नेऊ लागला तेव्हा त्याने हल्ला केला. मालक त्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत होता पण उंटाने त्याला उचलून आपटलं. नंतर त्याने मालकावर हल्ला करत त्याचं डोकं चावून टाकलं.
उंटाला काबू करण्यासाठी गावकर्यांना सहा तास लागले. पण तोपर्यंत उर्जारामचा वेदनादायक मृत्यू झाला होता. या उंटाने पूर्वीही आपल्या मालकावर हल्ला केला होता.
उल्लेखनीय आहे की उंट चावण्यासाठी कुविख्यात आहेत. यापूर्वीही उंटाद्वारे मनुष्यावर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. 2015 मध्येही गुजरात येथील नरोदा (अहमदाबाद) येथे उंटाने दोन लोकांवर हल्ला केला होता त्यातून एकाचा जीव गेला होता, उंटाने त्याच्याही डोक्यावर हल्ला केला होता. या क्षेत्रात भारतीय सुरक्षा दले उंटांवरच गश्त करत असतात.