Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काळ्या पैशावरून रामदेवबाबा सरकारवर नाराज

काळ्या पैशावरून रामदेवबाबा सरकारवर नाराज
चंदीगड , सोमवार, 13 जून 2016 (11:03 IST)
‘काळा पैसा परत आणण्यासाठी सरकार पुरेसे प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे मी आणि या देशाची जनता सरकारवर नाराज आहे. या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोललो आहे, असे योगगुरू बाबा रामदेव म्हणाले गेल्या डिसेंबरमध्येही त्यांनी काळा पैसा परत आणण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नावर नाराजी व्यक्ती केली होती आणि सरकार याबाबत लवकरच ठोस कृती करील, अशी आशा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली. सरकारच्या विकास कार्यक्रमाची आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या धोरणाची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, ‘मोदी सरकारमधील रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मोठे काम करीत आहेत. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही रस्ता प्रकल्पांच्या कामात प्रशंसनीय कार्य करीत आहेत. सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध निश्चित धोरण स्वीकारल्याने भ्रष्ट लोकांविरुद्ध पावले उचलण्यात येत आहेत.’

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कावळा बसल्याने मुख्यमंत्र्यांनी बदलली गाडी