Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गंगाजल पोस्टातून घरपोच

गंगाजल पोस्टातून घरपोच
दिल्ली , मंगळवार, 31 मे 2016 (12:13 IST)
पवित्र मानलं जाणारं गंगाजल पोस्टाच्या माध्यमातून भाविकांच्या घरी पोहचवण्याची नवी योजना केंद्र सरकार लवकरच सुरु करणार आहे.

ऑनलाईन बुकिंग करुन हरिद्वार आणि ऋषिकेषमधील गंगाजल घरपोच पाठवणं शक्य होणार आहे. दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात घोषणा केली. या गंगाजलसाठी नागरिकांना किती रुपये मोजावे लागतील याचा निर्णय अद्याप झालेला नाही. योजना कधी चालू होणार याबद्दलही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत