Publish Date: Fri, 21 Aug 2015 (11:30 IST)
Updated Date: Fri, 21 Aug 2015 (11:38 IST)
मुंबई : घरगुती वापराचे गॅस सिलिंडर असलेल्यांना यापुढे शिधापत्रिकेवर रॉकेल न देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे.
एका गॅस सिलिंडरची जोडणी मिळालेल्यांना वर्षभरात १२ सिलिंडर मिळत असल्याने यापुढे त्यांना केरोसिन मिळणार नाही, असे विभागाने आज काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दोन्ही भागात समान केरोसिन वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.