Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चर्चेत आहे हे हायप्रोफाइल किन्नर, सीएम दंपतीला बनवले मुलगी जावई

चर्चेत आहे हे हायप्रोफाइल किन्नर, सीएम दंपतीला बनवले मुलगी जावई
, बुधवार, 25 मे 2016 (17:35 IST)
उज्जैन सिंहस्थामध्ये चर्चेत आलेले किन्नर आखाड्याची आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी सीएम दंपती (शिवराजसिंह व साधना चौहान) यांना मुलगी जावई बनवून एकदा परत चर्चेत आहे. मुख्यमंत्री चौहान पत्नी साधनासिंहसोबत किन्नर आखाड्याच्या पंडालमध्ये पोहोचले होते. याने उत्साहित आखाड्याचे सदस्यांनी त्यांची जोरदार आवभगत केली. 
  
चर्चे दरम्यान लक्ष्मीने सीएमला सांगितले की देशातील 12 राज्यांमध्ये किन्नर आयोगाचे गठन झाले आहे पण मप्र मध्ये अद्याप झाले नाही. लक्ष्मीने म्हटले की याचे सर्कुलर आहे माझ्याजवळ. यावर सीएमने १५ जून रोजी सर्कुलर घेऊन भोपाळ येथे येण्यास सांगितले. त्यांनी म्हटले होते की भोपाळमध्ये सर्कुलर बघून आयोगाच्या गठनाचे काम सुरू करून देतील. आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीने साधनासिंहला भेट देऊन मुलगी मानले. सीएमला जावई मानून त्या दोघांना आशीर्वादपण दिला.  
 
webdunia
कोण आहे लक्ष्मीनारायण त्रिपाठी?
लक्ष्मीनारायण त्रिपाठी बर्‍याच वेळेपासून किन्नरांच्या हक्कासाठी काम करीत आहे. लक्ष्मी बिग बॉसशिवाय इतर टीव्ही शोमध्ये दिसली आहे. समाजाच्या हिताशी निगडित बर्‍याच मुद्द्यांवर लक्ष्मीने आपली आवाज बुलंद केली आहे. उज्जैन सिंहस्थापासून अस्तित्वात आलेल्या किन्नर आखाड्याच्या गठनमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण योगदान आहे. सिंहस्थ दरम्यानच लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वरपण बनवण्यात आले आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सेक्ससाठी नकार दिला, तर पत्नीचा खून