Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेएनयू : देशविरोधी घोषणांचे व्हिडिओ खरे

जेएनयू : देशविरोधी घोषणांचे व्हिडिओ खरे
नवी दिल्ली , सोमवार, 13 जून 2016 (08:11 IST)
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी देणार्‍या व्हिडिओची सत्यता पडली आहे. सीबीआयच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने हे व्हिडिओ खरे असल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हिडिओची सत्यता पटल्यामुळे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी कन्हैयासह अन्य दोघांवर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आहेत.
 
पोलिसांना एका हिंदी वृत्तवाहिनीकडून मिळालेल्या व्हिडिओ फुटेजची सत्यता पडताळण्यासाठी तो व्हिडिओ दिल्लीतील सीबीआयच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला होता. यासह कॅमेरा, मेमरी कार्ड आणि व्हिडिओ क्लिपची सीडी, वायर आणि अन्य उपकरणेदेखील तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
 
यासंदर्भात सीबीआयने दिल्ली पोलिसांना 8 जून रोजी अहवाल सादर केला. ज्यात संबंधित व्हिडिओ खरा असल्याचे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युवकांसाठी बदल आवश्यक : मोदी