Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जॉन केरी यांनाही वाहतूक कोंडीचा फटका

जॉन केरी यांनाही वाहतूक कोंडीचा फटका
अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉन केरी यांनाही बुधवारी दिल्लीतील वाहतूक कोंडीचा फटका बसला. संततधार पाऊस आणि शहरात पाणी साचल्यामुळे त्यांचे काही नियोजित कार्यक्रम रद्दही करण्यात आले. 
 
केरी यांच्या उपस्थितीत बुधवारी दिल्ली आयआयटीमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते प्रचंड पावसामुळे उशिरा पोहोचले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना “तुम्ही येथे येताना बोटींचा वापर करता काय?’’ असा प्रश्न विचारत विनोदही निर्माण केला. त्याचबरोबर कार्यक्रमस्थळी उशिरा पोहोचल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. यापूर्वी सोमवारीही केरी यांना वाहतूक कोंडी आणि संततधार पावसाचा फटका बसला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणेशोत्सवाच्या तोंडावर पेट्रोल, डिझेल भडकले!