Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डाळींच्या साठेबाजांवर छापे घाला: केंद्र

डाळींच्या साठेबाजांवर छापे घाला: केंद्र
नवी दिल्ली- बाजारात डाळींचे भाव वाढत चालले असून ते 170 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने साठेबाजांवर छापे घालणचे आदेश तपास यंत्रणांना दिले आहेत. म्यानमार आणि आफ्रिका या देशांमधून डाळींची आयात करून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बफर स्टॉक आणखी मजबूत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 
अन्नधान्याच्या वाढत्या दराचा आढावा घेण्यासाठी बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहनसिंह, अन्नमंत्री रामविलास पासवान, वाहतूकमंत्री नितीन गडकरी, वाणिज्यमंत्री निङ्र्कला सीतारामन, शहर विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू उपस्थित होते. सध्या बाजारात डाळींचे भाव 170 रुपये प्रतिकिलो, तर टोमॅटोचे भावही 100 रुपये प्रतिकिलोच्या आसपास पोहोचले आहेत. ही दरवाढ होण्याची कारणे आणि दरवाढ रोखण्याचे पर्याय यावर प्रामुख्याने बैठकीत चर्चा झाली. डाळींची जास्त मागणी असलेल्या राज्यांसाठी बफर स्टॉकमधून डाळींचा अतिरिक्त पुरवठा करणे या बाबींवर बैठकीत चर्चा झाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वीरेंद्र तावडेच कोठडीत वाढ