Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तीन महिन्यात 116 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

तीन महिन्यात 116 शेतकर्‍यांच्या आत्महत्या
नवी दिल्ली- 2016च्या पहिल्या 3 महिन्यात दुष्काळाची तीव्रता अधिक भीषण झाली असून या दरम्यान शेतकर्‍यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. या 3 महिन्यात नापिकीमुळे 116 शेतकर्‍ांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये देशभरात सर्वाधिक जास्त आत्महत्याचे प्रमाण महाराष्ट्रात आहे, त्यानंतर पंजाब व तेलंगणा राज्यांमध्ये झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली आहे. 
 
नापिकीमुळेच गेल्या वर्षी म्हणजेच 2015 मध्ये 2,000 शेतकर्‍ांनी आत्महत्या केली होती. त्यामध्ये एकटय़ा महाराष्ट्रात 1,841 शेतकर्‍ांनी आत्महत्या केल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. 
 
गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात 57 शेतकर्‍ांनी आत्महत्या केली. तर पंजाबमध्ये 56 आणि तेलंगणामध्ये तीन शेतमजुरांनी आत्महत्या केली असल्याची माहिती रेकॉर्डला असल्याचे केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी लोकसभेत सांगितले. 
 
देशातील अनेक राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती ओढावली असून यामध्ये कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज रुग्णालयात