भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश करुन दर्शन घेतले. त्यांना मजारमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. पोलिसांनी यावेळी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
महिलांना मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी तृप्ती देसाईंनी लढा सुरु केला आहे. शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन केले ज्यानंतर महिलांना प्रवेश दिला जाऊ लागला. पुरुषांसोबत महिलांनाही दर्शनाचा हक्क मिळावा यासाठी मंदिरांमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर तृप्ती देसाईंनी आपला मोर्चा हाजी अली दर्ग्याकडे वळवला होता.